रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी 31 डिसेबंरच्या आत कालव्याची दुरुस्ती करा- आमदार रहांगडाले

0
116

तिरोडा,दि.31:- तालुक्यातील धापेवाडा उपचा सिंचन योजना टप्पा १ अंतर्गत लाभक्षेत्रातील गावांना रब्बी हंगामात पाणी मिळावे याकरीता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी मुंडीपार,मांडवी येथील कालव्याची पाहणी करुन अधिकार्यांना निर्देश दिले.येत्या 31 डिसेंबरपर्यंत कालव्याची दुरुस्ती कुठल्याही स्थितीत करण्यात यावे जेणेकरुन रब्बी हंगामात शेतकर्याला पाणी मिळेल याबाबत काळजी घेत दुरुस्तीचे काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. पाहणी दरम्यान मुंडीपार येथे टप्पा २ च्या पाईप लाईनचे काम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धानपिक असल्यामुळे प्रलंबित असल्याचे बघावयास मिळाले.धानकापणी सुरु असल्यामुळे येत्या २ दिवसात पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करून ३१ डिसेबंरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबधित विभागास देण्यात आले. तसेच घाटकुरोडा,चादोरी बूज, बिरोली,सालेबर्डी,भंबोडी,मुंडीपार,बेलाटी बूज,कवलेवाडा येथील शेतक-यांना रब्बीचे पाणी देण्याबाबत नियोजन करून जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवडयात रब्बी धानपिकाकरीता पाणी देण्यासंबधी डिसेंबरमध्ये बैठक शेतकऱ्यांना माहिती देण्याचेही निर्देश आमदार रहागंडाले यांनी दिले. यावेळी कार्यकारी उपअभियंता पंकज गेडाम,कनिष्ठ अभियंता नरेश हिंगे,कृ.ऊ.बा.स. उपसभापती विजय डिंकवार,डॉ.ब्रिजलाल रहांगडाले,पवन पटले,सरपंच वासुदेव हरीणखेडे,सरपंच डोमू चौधरी,सरपंच वनिता नागपूरे,प्रकाश भोंगाडे,सरपंच जयसिंग उपासे,मुन्नीलाल चौधरी,रवी मुटकुरे, प्रमोद खेवले व शेतकरी हजर होते.