आ.कोरोटेंच्या हस्ते आंभोरा धान केंद्रांचे उदघाटन

0
123

चिचगड,दि.02ः- देवरी तालुक्यातील आंभोरा येथे 1 नोव्हेंबरला आदिवासी विवीध कार्यकारी सहकारी संस्था आंभोराच्या वतीने शासकीय हमीभाव आधारभुत धान खरेदी केन्द्राचे उदघाटन आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.संचालक मंडळ व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार सहसराम कोरोटे म्हणाले की,कुठलाही शेतकरी हा केंद्रावरुन परत जाऊ नये त्याने आणलेले धान खरेदी करण्यात यावे.अध्यक्षस्थानी आदिवासी विकास महामंडळा नाशिकचे संचालक भगतसिंग दुधनांग होते.तालुका काँग्रेस अध्यक्ष संदिप भाटीया,सस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार राऊत,प्रल्हाद दुधनांग,बळीराम कोटवार सुकलाल राऊत,गौरसिंग करईबाग,बीसन मडावी,कृष्णाजी घरत,काशीराम कापसे,धुरपताताई कुंभरे,निताताई घरात,लखनलाल दुधकावरा,भीमराव गावळ व शेतकरी बांधव उपस्थित होते.संचालन संस्थेचे सचिव मधुकर शहारे यांनी केले.