गोंदिया,दि.02ः शहरानजीकच्या फूलचूर जिल्हा परिषद मतदारसंघात दिवाळीसणाच्या पार्श्वभूमीवर चाबीचे युवा नेते रोहित अग्रवाल यांंनी निर्जंतुकीकरण करण्याचे कार्य हाती घेतले आहे.फुलचुर पासून सुरवात करण्यात आली. कोरोना सारख्या विषणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सॅनिटाईज करणे आवश्यक असते.शहारासोबतच शहरानजीक असलेले ग्रामीण क्षेत्रातही सॅनिटाईज केला जात आहे.शहरानजीक असलेल्या गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक व्यवसायासाठी, नौकारीसाठी व इतर खरीदीच्या कामासाठी गोंदिया शहरात येजा करता असतात.अशावेशी रोकथाम करण्यासाठी पाऊल उचलले गेल्याची माहिती रोहित अग्रवाल यांनी दिली.
या कार्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी सावन कुमार यांना पत्राद्वारे विनंती केली गेली होती. त्यावर कार्यवाही करत सावन कुमार यांनी अग्निशमन विभागाला दिलेल्या निर्देशानुसार सदर कामास सुरुवात करण्यात आली. फुलचुर, फूलचूर टोला, चुटिया, रापेवाडा, चीचटोला इत्यादि गावात सॅनिटाईज करण्यात आले.या कार्याच्या पूर्णत्वासाठी शुभानराव रहांगडाले,मोहन गौतम, भुपेंद्र टेंभरे, डॉ. गंगाराम पटले, मोहन राणे, अजित टेंभरे, कपिल राणे, राजेश अंबुले, मोनू पारधी, प्रदीप दहिकर, महेंद्र सोनवाने, गणेश धोटे, अरविंद नारडे, दिलीप खंडेलवाल, सुखचंद येडे, दिनेश रहमतकर, अंकेश येडे, डॉ. रमेश गौतम, विजय रहांगडाले, सौ. आशाताई फुलसुंगे, आलोक लांजेवार इत्यादीं मंडळीनी सहकार्य केले.