34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू

0
657

blank

नागपूर दि. 02 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

blank