सोनी रोड खड्डेमय,त्वरीत रोडची दुरुस्ती करा अन्यथा वाहतूक बंद करणार-पंकज रहांगडाले

0
246

गोरेगाव,दि. 5ः गोरेगाव पासून सोनी,ठाणाकडे जाणारा रोड गेल्या अनेक दिवसापासून खड्डेमय झाला आहे. याकडे स्थानिक प्रतिनिधीने दुर्लक्ष केल्यामुळे रोडवरून चालणे कठीण झाले आहे.बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रोडची हालत खस्ता झाल्याने नागरीकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.रोडची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे जिल्हा चिटणीस व माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केली आहे. रस्ता दुरुस्ती न झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक बंद करून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
मुख्य रस्त्याकडे शासनाचे लक्ष नाही. क्षेत्रातील स्थानिक प्रतिनीधीचे दुर्लक्षामुळे मिलटोली ते तुमखेडा मार्गे निघणारा रस्ता,मोहगाव परिसरातील रस्ता सुध्दा बेताल अवस्थेत आहे.क्षेत्रातील अनेक रस्ते दयनिय आहे.सध्या सगळीकडे रोडरस्ते चांगले असावे यासाठी शासन भरपूर निधी खर्च करित आहे.जि.प.च्या बांधकाम विभागा कडूनही मोठा निधी खर्च केला जातो. पण स्थानिक प्रतिनिधी च्या दुर्लक्षामुळे क्षेत्रातील जनतेला नाहकच त्रास सहण करावा लागत आहे.या रोडरस्त्यांची त्वरीत दुरुस्ती व्हावी अशी मागणी पंकज रहांगडाले यांनी केली आहे.मागणी पूर्ण न केल्यास या मार्गावरील वाहतूक बंद करून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंकज रहांगडाले यांनी दिला आहे.