आमदार विनोद अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून 54 बोरवेलचा निर्माणकार्य सुरू

#गोंदिया विधानसभा क्षेत्रात 12 बोरवेल मंजुरीच्या प्रतीक्षेत

0
242

गोंदिया=गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून 54 हातपंप मंजूर करण्यात आले असून यापैकी बऱ्याच ठिकाणी कामे सुरू झाले आहेत. ग्रामीण क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गावकऱ्यांनी विविध ठिकाणी बोरवेलची मागणी केली होती. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 54 बोरवेलचे प्रस्ताव पाठविले व त्यानुसार कार्यवाही करत बोरवेल बांधकाम सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी बोरवेल करिता खड्डा खोदण्यात आलेले असून काही ठिकाणी हाथपंप सुद्धा बसविण्यात आलेले आहे.

काटी -2, बघोली- 1, सोनबिहिरी -1, बलमाटोला-1, फुलचूर -2, फुलचूर टोला-1, नागरा-2, सवारी -3, नवेगाव (पा)- 2, परसवाड़ा- 1, गिरोला-2, हीवरा-1, जिरुटोला-1, कोरनी-1, मोगरा-1, पोवारीटोला-1, घीवारी-2, चुटिया-2, बिरसोला-2, कोचेवाही-1, रावनवाड़ी-2, कटंगटोला-1, बनाथर-1, चंगेरा-1, खमारी -3, छिपिया-2, कासा-1, गर्रा खुर्द-3, लोधीटोला(चुटिया)-1, तेढ़वा-1, कुड़वा-1, अंभोरा-1, दासगाव(बु)-1, तुमखेड़ा-1, दतोरा-3 इत्यादि 54 ठिकाणी बोरवेल निर्मिती कार्य मंजूर असून कामे सुरू आहेत. तर तुमखेडा खुर्द -३,हलबिटोला (खमारी)-२, तांडा-१, दासगाव (खुर्द)-१, बडेगाव(प्लॉट)-१,कटंगटोला-१, चिरामनटोला-१, इर्री -१, तेढवा-१ या ठिकाणी बोरवेलचे नियोजन केले गेले आहे.

          उन्हाळात पिण्याच्या पाण्याचे समस्या ज्या भागात जास्त असते त्या ठिकाणी प्राधान्य देवून बोरवेल निर्मिती करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. या वर्षी लॉकडाऊन मुळे आधीच नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे त्यामुळे पुनः टंचाईची समस्या निर्माण होवून नागरिकांना त्रास होण्याआधीच सज्ज राहण्याचे कानमंत्र आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित विभागाला दिले आहे.