नगरपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविल्या

0
89

गोंदिया दि.12 = राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, सडक/अर्जुनी, देवरी, व अर्जुनी नगरपंचायतींचे प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर करण्यात आले आहे. जाहिर कार्यक्रमानुसार 10 नोव्हेंबर 2020 ला नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://gondia.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रत्येक नगरपंचायतीच्या कार्यालयात नागरिकांसाठी 17 नोव्हेंबर 2020 पासून उपलब्ध असेल.

प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यासाठी 18 नोव्हेंबर 2020 ते 26 नोव्हेंबर 2020 पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. तरी याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी प्रारुप प्रभाग रचनेत काही हरकती व सूचना असल्यास त्याबाबत विहित कालावधीत संबंधित नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्याकडे लेखी स्वरुपात नोंदवावे. प्राप्त हरकती व सूचनांवर 4 डिसेंबर 2020 पर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.