पिंडकेपार येथे क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा यांची १४५ वी जयंती साजरी

वीर बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान- नितेश वालोदे

0
894

पिडकेपार/देवरी=जल, जंगल, जमीन व स्वाभिमान या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य सेनानी प्रकृती रक्षक क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा यांची १४५ वी जयंती पिडकेंपार येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितेश वालोदे सामाजिक कार्यकर्ता हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक मधु दिहारी, विलास कोल्हारे हे होते.
पाहुण्यांच्या हस्ते वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व सहाय्यक शिक्षक कुंडलिक दिहारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून ध्वजारोहण करण्यात आले.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी तत्कालीन ब्रिटिश राजवटी विरुद्ध आदिवासी दलित समाजातील लोकांचे धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी मोठा लढा दिला आहे. क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. वीर बिरसा मुंडा आदिवासी समाजासाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे असे मत नितेश वालोदे यांनी आपल्या विचारातून मांडले.
प्रा.मधुजी दिहारी, नितेश वालोदे सामाजिक कार्यकर्ता, विलास येल्ले, विलास कोल्हारे, अनिल कोल्हारे, आदिवासी बिरसा ब्रिगेड संघटनेचे सदस्य व समस्त ग्रामवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.