भंडारा कोराना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के,आज 45 नवे पॉझिटिव्ह

0
328

भंडारा दि. 17 : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण अधिक आहे. रूग्ण बरे होण्याचा दर 91 टक्के झाला असून रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 94 दिवसावर पोहचले आहे. जिल्हयात आज 91 रूग्ण बरे होऊन घरी गेले असून 45 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला.

            आज 390 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 78 हजार 524 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 9602 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

            जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 15, मोहाडी 05, तुमसर 04, पवनी 01, लाखनी 06, साकोली 08 व लाखांदुर तालुक्यातील 06 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 8731 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 9602 झाली असून 637 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 01 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 234 झाली आहे.

            रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.92 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.43 टक्के एवढा आहे.

            शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरीकांना आवाहन

  • कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
  • साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
  • साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.