आदिवासी आश्रमळेतील शिक्षकांचा मोर्चा

0
3

देवरी, दि. ५ : अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाèयांनी विविध मांगण्यांसाठी देवरीच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर शनिवारी (दि. ५)मोर्चा काढला.
समायोजन होईस्तोवर वेतन अदा करण्यात यावे, वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी, वरिष्ठ श्रेणी लागू करावी, पोस्ट क्रिएशन तात्काळ करावे, थकीत वेतन द्यावे, अर्जित रजा बील, भविष्य निर्वाह निधी हिशेब वितरण पत्र, डी.डी.ओ.चे अधिकारी मुख्याध्यापकांना द्यावे, दरमहा एक तारखेला वेतन द्यावे, वर्ग तीन कर्मचाèयांच्या शिक्षण सेवक व कायम‘ मान्यता प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर आजपासूनच बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात होणार आहे.