श्रमिक पत्रकारसंघाचे सामाजिक न्यायमंत्र्यांना निवेदन

0
11

गृहविभागाच्या शासन निर्णयाचा नोंदविला विरोध

गोंदिया,दि.5- श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज (दि.5)राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांना गोंदिया येथील विश्रामगृहात भेटून राज्य सरकारच्यावतीने 27 आॅगस्ट 2015 रोजी काढण्यात आलेल्या गृहविभागाच्या शासन निर्णयाचा विरोध दर्शविण्यात आला.तसेच तो शासन निर्णय मागे घेण्यासंबधी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यासंबधी निवेदन सादर करुन चर्चा करण्यात आली.ना.बडोले यांनीही आपणास याबाबत स्पष्ट माहित नसून मा.मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले.सोबतच महाराष्ट्र प्रदेश श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष यदु जोशी यांच्याशी ना.बडोले यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन गोंदिया श्रमिक पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनासंदर्भात चर्चा केली.यावेळी संघाचे सचिव संजय राऊत,प्रा.एच.एच.पारधी,सावन डोये,खेमेंद्र कटरे,रवी सपाटे,हरिष मोटघरे,चंद्रकांत बहेकार,महेंद्र माने,ऋषी कावळे,सुरेश येळे,मनिष मुनेश्वर आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे,भरत क्षत्रिय,झामसिह येरणे,घनश्याम पानतवणे हे सुध्दा मान्यवर उपस्थित होते.