सीईओ साहेब प्रवेशद्वाराला कुलूप नको,पोर्चमधली वाहने हटवा

0
7

गोंदिया दि. ८-गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला असलेल्या मुख्यप्रवेशद्वाराव्यतिरिक्त दुसèया दोन सामान्य प्रवेशद्वारांना कुलूप लावण्यात आल्याने कर्मचारी असो की सामान्य जनतेला प्रशासकीय इमारतीतून बाहेर पडण्यासाठी व आत येण्यासाठी एकाच प्रवेशद्वाराचा वापर करावा लागत आहे.सोमवारपासून सीईओ यांच्या आदेशाने त्या दोन प्रवेशद्वारांना कुलूप ठोकण्यात आले आहे.कारण काय तर कर्मचारी वेळेवर येत नाही आणि आधीच निघून जातात अशी चर्चा आहे.चर्चेतले कारण म्हणजे एक हास्यव्यंग ठरणारे वाटते.सीईओ साहेब तुम्हाला तुमच्या कर्मचारी अधिकारी वर्गावर वचकच ठेवायचा असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर स्वत तुम्ही ९.४५ ला हजेरीरजिस्टर घेऊन उपस्थित राहा म्हणजे तुम्हांलाच कळेल किती कर्मचारी उशिरा येतात आणि जातात.त्यासाठी इतर प्रवेशद्वारांना कुलूप ठोकून सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे कारण नाही.उलट मागच्या बाजूला असलेल्या पोर्चमध्ये ठेवण्यात येणाèया वाहनांना तिथून हलवून इतर पदाधिकाèयांच्या वाहनांना त्या पोर्चमध्ये उभे करण्यासाठी मोकळा केल्यास पदाधिकारी यांचे वाहन तिथे राहू शकते तसेच सर्वसामान्य जनतेला सुध्दा जो त्रास त्या पोर्चमधून जायला व्हायचा तो होणार नाही.तसेच मागच्या मोकळ्या भागात कोणी कसेही लावत असलेले चारचाकी,दुचाकी वाहनास शिस्त लावल्यास बरे होईल. कारण काही नव्या पदाधिकाèयांच्या पतीराजांना आपले वाहन हे पोर्चमध्येच असावे असे वाटू लागले आहे.काहींनी तर आपल्या वाहनचालकांनाही तसे सांगत अध्यक्षाच्या वाहनानंतर आपलेच वाहन पाहिजे असाही इशारा दिला आहे.