गोंदिया,दि. ८. प्रृ्रु -जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून नव्हे तर वर्षापासून जिल्हा परिषदेंतर्गत वर्ग ४ च्या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या परिचरांना गणवेश निधी अद्यापपर्यंत देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे.शासनाच्या धोरणानुसार परिचरांना एकतर गणवेशाचा कापड दिले जाते qकवा गणवेश खरेदीचा बिल सादर करून त्याचे देयक संबधिताला देता येते.परंतु गेल्या दीड दोन वर्षापासून सामान्य प्रशासन विभागाने परिचरांच्या गणवेश खरेदीकडेच दुर्लक्ष केले आहे.प्रशासनावर आपला वचक निर्माण करण्यासाठी धडपड करणाèया सीईओचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले आहे