पालकमंत्र्याच्या उपस्थितीत होणार अभियंता दिन

0
3

गोंदिया,दि. ८-भारतरत्न सर विश्वेश्ररय्या मोक्षगुडंम यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.येत्या १५ सप्टेबंरला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्हा अभियंता संघटनेच्या वतीने अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम येथील डब्लीगं ग्राऊंडस्थित मीलन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.त्यापूर्वी १४ सप्टबेंरला जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंता,अधीक्षक अभियंता,उपअभियंता,शाखा अभियंता,अभियंता,बेरोजगार अqभयत्याच्या कुटुबांसाठी पारिवारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध स्पर्धां आयोजित करण्यात आले आहे.तर मुख्य कार्यक्रम १५ सप्टेंबरला साजरा होणार आहे.या कार्यक्रमात येत्या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा सुध्दा करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता के.ए.चव्हाण,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे,कार्यकारी अभियंता निखाडे,प्र.कार्य.अभियंता संजय कटरे,यांच्यासह रेल्वेचे मुख्य अभियंता व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.