गोंदिया,दि.8-गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्या.गोंदियाच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत किसान विकास आघाडीचे राजकुमार कुथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विशेष म्हणजे कुथे यांची अध्यक्षपदी तिसर्यांदा निवड झाली आहे.विशेष म्हणजे किसान सहकार पॅनल स्थापन करुन ही निवडणुक लढविण्यात आली होती.निवडणुक सुध्दा बिनविरोध करण्यात कुथे यांची भूमिका महत्वाची होती.माजी आमदार व संघाचे संचालक दयाराम कापगते यांनी कुथे यांच्यासोबत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते.नवनिर्वाचित संचालकामध्ये दयाराम कापगते,चोपलाल राणे आदींचा समावेश आहे.