गोंदिया,दि.९-: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज गुरूवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता फुलचूर नाका येथे आयोजित करण्यात आले आहे.
ना. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल तर विशेष अतिथी म्हणून खासदार नानाभाउ पटोले उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जि. प. उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि. प. सभापती छायाताई दसरे, देवराम वडगाये, माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. दयाराम कापगते, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. केशवराव मानकर, माजी आ. हरिश मोरे, माजी आ. खोमेश रहांगडाले, माजी आ. भेरqसह नागपुरे, माजी आ. हेमंत पटले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे दोन जिल्ह्याचे खासदार असलेले नाना पटोले हे विशेष अतिथी ठरले आहेत.तर चिमुरच्या खासदारांचा पत्रिकेत कुठेच उल्लेख दिसून येत नाही.जेव्हा की,पालकमंत्र्याच्या कार्यालयाचे उदघाटनासाठी राज्यातील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याला आमंत्रित करायला हवे होते.परंतु तसे का केले गेले नाही,हे भाजपच्या नेत्यांनाच ठाऊक असले तरी ज्या ठिकाणी हे कार्यालय सुरु करण्यात येत आहे,ते शहराबाहेर ठेवण्यामागची भूमिका काय यावर खलबते सुरु झाले असून हे कार्यालय शासकीय राहणार की भाजपचे पदाधिकारीच चालवणार हे भविष्यात दिसणार आहे.पालकमंत्री यांचे कार्यालय म्हटले की शासकीय असायला पाहिजे परंतु पत्रिकेवरुन आणि जे नियोजन करुन यासंबधीची माहिती पुरवित आहेत ते बघितल्यावर भाजपचेच कार्यालय राहणार असल्याचे चित्र आहे.त्यातच या कार्यालयात शासकिय अधिकारी असलेले निनावे यांना तर पालकमंत्र्याच्या या कार्यालयात कोण येतोय जातोय याच्याशी काहीच सोयरसुतक नसल्याचे चित्र असून आपल्याच गुंगीत वावरतांनाचे चित्र बघून पालकमंत्र्याच्या या कार्यालयातील अशा अधिकार्याकडून जनतेला समाधानकारक उत्तर मिळेल याबद्दल तरी आजच्या घडीला शंकाच आहे.