रुग्णांच्या नातेवाइकांना असभ्य वर्तणूक
डॉ. बंग यांना हटवा, रुग्णांच्या नातेवाइकांनीही लावले नारे
गोंदिया,दि.९ – येथील केटीएस रुग्णालयात औषधोपचाराकरिता आलेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालय प्रशासनाकडून असभ्य वर्तणूक दिली जाते. हा आजवरचा अनुभव आहे. बुधवारी (दि.९) कर्तव्यावर असलेल्या डॉ. बंग यांच्याकडून रुग्णांच्या नातेवाइकांना असभ्य वागणूक दिली गेली. हा प्रकार ङ्काहित होताच युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकत्र्यांनी दुपारी १२ वाजता रुग्णालयावर हल्लाबोल केला. डॉ. बंग मुर्दाबाद असे नारे लावत त्यांना ताबडतोब हटविण्याची ङ्कागणी केली. युवासेनेचे हे रुप पाहून पीडित रुग्णांच्या नातेवाइकांनीही नारेबाजी लावत रुग्णालयाच्या ढेपाळलेल्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.रवी धकाते यांच्या रुग्णालयाकडे लक्षच नसून काही संस्था व अशासकीय सदस्यांना घेऊन शासन निर्णयांना डावलून निधी खर्च करण्याकडेच त्यांचा लक्ष दिसून येत आहे.छायाचित्राच्या माध्यमातून प्रसिध्दीमाध्यमात कसे राहता येईल याकडे त्यांचे लक्ष असल्याने रुग्णालयातील त्यांच्या अवतीभवती फिरणार्याकडे बघितल्यानंतर या रुग्णालयात चांगला उपचार मिळेल म्हणून जे येतात त्यांचा आता हिरमोड होऊ लागला आहे.कारण जिल्हा शल्य चिकित्सकाचा दबावच वैद्यकिय अधिकारी यांच्यावर राहिलेला नाही.कारण त्यातील काही वैद्यकीय अधिकारी हे सुध्दा फोटोसेशन कार्यक्रमात त्यांच्यासोबत राहत असल्यानेच या रुग्णालयाची दुरावस्था होत चालली आहे.
गेल्या महिनाभरापासून वातावरणात बदल घडून आला आहे. त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला, हिवताप, डोकेदुखी, विषङ्कज्वर अशा विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये कधी औषधांची कमतरता तर कधी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाही. परिणामी, रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला घेऊन थेट जिल्हास्थळी असलेले शासकिय रुग्णालये गाठतात. त्यामुळे जिल्हास्थळी असलेले शासकिय रुग्णालये रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी हाउसफुल्ल आहेत. केटीएस रुग्णालयातील गैरसोयी आणि रिक्तपदांमुळे रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळत नाही. परिणामी रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप आहे. आज बुधवारी (दि.९ ) अशाच संतापाचा पारा फुटला. केटीएस रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसोबत असभ्य वर्तणूक केली जात असल्याची कुणकुण युवासेनेच्या पदाधिकार्यांना लागली आणि त्यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास थेट रुग्णालय गाठले. डॉ. बंग यांना त्यांनी जाब विचारत धारेवर धरले. एवढेच नव्हे तर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच डॉ. बंग मुर्दाबाद असे म्हणत घोषणाबाजी केली. रुग्णांच्या नातेवाइकांसोबत असभ्य वर्तन करणाèया डॉ. बंग यांना ताबडतोब हटविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी रेटून धरली होती. युवासेनेच्या या आंदोलनात पीडित रुग्णांचे नातेवाइकही सहभागी झाले. त्यांनीही रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत नारेबाजी लावली. यावेळी मोठा जमाव निर्माण झाला होता. या जमावाने आपबिती कथन करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकाचे दालनही गाठले. परंतु, ते बराच वेळ उपलब्ध झाले नाही. अखेर तासभराने आपल्या दालनात आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकाकडे आंदोलकांनी आपल्या गाèहाणी मांंडल्या. यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत घडलेल्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने जमाव थोडा शांत झाला. या हल्लाबोल आंदोलनात युवासेनेचे शहरप्रमुख पुरूषोत्तम ठाकरे, उपशहरप्रमुख परेश अनवानी, अतुल दादूरिया, दीपक मिश्रा, हर्षल पवार, शिवम वैद्य, विनोद तामसेटवार, पंकज चौरागडे, शिवसेनेचे समीर आरेकर, चुन्नीभाऊ चौरावार यांच्यासह रुग्णांचे शेकडो नातेवाइक सहभागी झाले होते.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी वास्तविक सकाळच्या सत्रापासूनच कार्यालयात हजर राहयाला हवे,परंतु तसे होत नाही.ते कधीच दुपारी,सकाळी उपस्थित राहत नाही.आपल्या कार्यालयात सोयीने सायकांळी येत रात्रीपर्यंत बसतात.त्यावेळी त्यांच्या शासकीय अधिकारी,कर्मचारी नव्हे तर खासगी संस्थाचे लोक बसले असल्याचे चित्र अनेकदा बघावयास मिळाले.जे त्याच परिसरात असले्ल्या गरीब महिलांच्या दुकानाचे पैसे देऊ शकत नाही अशांना आपल्या डोक्यावर घेण्याचे काम सुध्दा सीएस यांनी केले आहे.तर काहींना काही साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट देऊन त्यांची व्यवस्था केल्याची खुलेआम रुग्णालयात बोलले जात आहे.