खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.९-:राज्यात व केंद्रात जेव्हापासून भारतीय जनता पक्षाची स्वबळावर सरकार आली,तेव्हापासूनच पक्षाला चांगले दिवस आले.त्यातही या विजयामुळे काही नेत्यांना चांगली संधी मिळाली तर काहींना असंतोषाचा फटका सहन करत गप्प बसावे लागले.असे असतानाही राज्यात आपल्याच पक्षाचे सरकार आहे याचा अद्यापही भाजपच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना विसर पडल्याचे चित्र असल्याची कबुली भाजपच्या अनेक मान्यवरांनी दिली आहे.त्यातच आपल्या सरकारमधील जे मंत्री संबधित जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,त्यांनी आपल्या जिल्ह्यातील नागरिकांशी सवांद साधण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरु करावे असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.त्यानुसार काही जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या जनसंर्पक कार्यालयाचे उदघाटनही करण्यात आले.त्याच कळीत उद्या गुरुवारी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत आहे.या कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यासाठी जिल्हा भाजपने चांगली तयारी केली यात शंकाच नाही.पक्षातील सर्वच मान्यवरांना त्यांनी स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु हे करीत असताना आपण कुणाला विसरत तर नाही ना याची तसदी घेण्याचा प्रयत्न सुध्दा भाजपने केला नाही,ही खऱी शोकातिकांच म्हणण्याची वेळ आली आहे.कारण जी निमत्रंण पत्रिका तयार करुन वितरित करण्यात आली.त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये माजी सर्वच आमदारासहं विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले.तसेच विद्यमान भाजपच्या जिल्हा परिषदेतील पदाधिकार्यांनाही स्थान दिले यात काही वाईट नाही.परंतु पक्षाच्या सर्वात वरिष्ट असलेेले माजी खासदार चुन्नीलालभाऊ ठाकुर यांना गोंदिया जिल्हा भाजप विसरली.त्यानांत नव्हे तर पालकमंत्री हे पुर्ण जिल्ह्याचे असताना त्यांच्या कार्यक्रमाला चिमूरचे खासदार अशोक नेते पत्रिकेतील मान्यवर तर नाहीच.परंतु जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा भाजपच्या वतीने अध्यक्षपद भुषवण्याची संधी मिळालेले आणि राज्यमंत्र्याचा दर्जा राहिलेल्या अध्यक्षपदावर राहिलेले गोंदियाचे नेतराम कटरे यांना सुध्दा डावलण्यात आले आहे.
यासर्व प्रकरणात पालकमंत्र्याच्या काही हात असण्याची शक्यताच नाही कारण ते मुंबईत असताना ही पत्रिका तयार करण्यात आलेली आहे.त्यातही नेहमी भाजपच्या संघटनमंत्र्याला नाव ठेवले जात होते.परंतु आता तर गोंदियाचे संघटनमंत्र्याचीच हकालपट्टी पक्षाने केली आहे.त्यामुळे त्यांनी या तिघांची नावे वगळली असतील असे म्हणणेही योग्य होणार नाही.तेव्हा पक्षाच्या वरिष्ठांनी वरिष्ट असलेले सहकारनेते व माजी खासदार चुन्नीलाल भाऊ ठाकुर यांच्यासह इतरांची नावे कुणी वगळली याचा शोध घेण्याची नव्हे तर चिंतनाची वेळच पक्षावर आली आहे.