कटंगी मध्यमप्रकल्पाने घेतला दुसरा बळी

0
8

गोरेगाव दि.१० : कटंगी मध्यम प्रकल्पात संपूर्ण शेतजमिन गेल्याने भुमिहीन झालेल्या शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.९) दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव दशरथ चुन्नीलाल चचाने (४५) रा.पिंडकेपार असे आहे.
शेतकNयांना सिंचनाची सोय करून त्यांचे जीवन सुजलाम् सुफलाम करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेला कटंगी मध्यम प्रकल्प आजघडीला शेतकNयांचा कर्दनकाळ ठरला आहे. प्रकल्पात अनेक शेतकNयांच्या जमिनी शासनाने संपादीत केल्या. शेतकरी भुमिहीन झाले. हाताला काम नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही. अशा गंभीर समस्येच्या कात्रीत अडकलेल्या अनेक शेतकNयांना जीवन जगायचे कसे असा गंभीर प्रश्न पडू लागला आहे. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत कर्जाचे डोंगर वाढल्याने कटंगी मध्यम प्रकल्पाबाधीत शेतकरी आत्महत्येच्या ७० दिवसात तब्बल दोन घटना घडल्या. यापुर्वी १७ जून रोजी नंदलाल काशीराम बिसेन (५५) या प्रकल्पबाधीत शेतकNयाने स्वत:च्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. (दि.९) याच घटनेची पुनरावृत्ती झाली. पिंडकेपार निवासी दशरथ चुन्नीलाल चचाने (४५) या शेतकरी पुत्राने कर्जाला वंâटाळून आत्महत्या केली आहे. मृतकाची जमिन कटंगी मध्यमप्रकल्पात संपादीत करण्यात आली होती. एक वर्षापूर्वी पुनर्वसन अनुदान मृतकाच्या परिवाराला मंजूर झाला. मात्र, आत्तापर्यंत त्या कुटूंबाला पुनर्वसन पॅकेज प्राप्त झाला नाही. परिणामी मृतक शेतकरी तणावात होता. पुनर्वसन अनुदानाच्या प्रतिक्षेत पिंडकेपार गावातील शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे कटंगी प्रकल्प पुन्हा आणखी किती शेतकNयांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मृतक दशरथ चचाने यांच्या वडीलांच्या नावे चार एकर शेती होती. कटंगी मध्यम प्रकल्पाने ती संपूर्ण जमीन गिळंकृत केली. परिणामी ते शेतकरी कुटुंब भूमिहीन झाले. २०१४ या वर्षी या पिडीत परिवाराला पुनर्वसन अनुदान देखील मंजुर झाला. मंजुर झालेला अनुदान आज नाही तर उद्या नक्कीच मिळेल. या आशेवर शेतकरी कुटुंब जगत आहे. आशेपोटी मृतक शेतकNयाने अनेकांकडून कर्जदेखील घेतले. मात्र, अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नसल्याने शेतकNयाला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला आहे. मृतकाला दोन मुली, एक मुलगा व एक बहीण आहे. यावर्षी घरात लग्न करायची तयारीदेखील होती. मात्र, पुनर्वसनाची रक्कम मिळण्याची आशादेखील या शेतकNयाने अखेरीस सोडली. आशेवर पाणी पेâरल्याचे समजुन शेतकNयाने अखेर शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी केली असून मर्ग नोंदविला आहे. पुढील तपास पोहवा. नागपुरे करीत आहेत.