गोंदिया,दि,.१०-जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार (दि.९) मग्रारोहयचो गटविकास अधिकारी एन.के. भांडारकर यांनी स्वीकारला. सन २०१९ पर्यंत देशाला निर्मल करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार अभियानाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता, या पदाचा प्रभार सोपविला.