धोटे बंधू महाविद्यालयात झुलॉजी सोसायटीचे उद्घाटन

0
20

गोंदिया,दि.१०-गोंदिया शिक्षण संस्थेद्बारा संचालित स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात झुलॉजी (जीवशास्त्र)सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शुभांगी नरडे, डॉ. गुणवंत गाडेकर, डॉ. शीतल जुनेजा, डॉ. धरना टेंभरे आणि प्रा. माधुरी राजे मंचावर उपस्थित होते. डॉ. गुणवंत गाडेकर यांनी झुलॉजी सोसायटी स्थापन करण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, की विद्याथ्र्यांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करणे आणि त्याचा सर्वांगीण विकास हो ह्या उद्देशाने या सोसायटीची स्थापना करण्याच्या मागचा उद्देश आहे. डॉ. शीतल जुनेजा यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना नि:स्वार्थ भावाने परिश्रम करावे आणि आपल्या ज्ञानाला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्याचे काम करावे असे सांगितले. यावेळी प्रा. शुभांगी नरडे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वर्षभर घेण्याच कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्रियंका परमार, वैष्णवी देशपांडे आणि आकाश पारधी ने केले.स्वागत गीत मनीषा, पूजा, स्वाती, रूकसार यांनी सादर केले. संचालन अनमोल ठाकरे यांनी तर आभार श्रद्धा तिवारीने मानले.