फत्तेपुर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

0
20

गोंदिया,दि.१३- तालुक्यातील फत्तेपुर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सातपैकी चार जागेवर विजय मिळवीत भाजपाने ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापित केली.
नवनिर्वाचित सदस्यांपैकी सरपंचपदी चेतावणी सुभाष डोंगरे यांची तर उपसरपंचपदी मिना मिताराम कटरे यांची निवड करण्यात आली असून, तुळशीदास मेश्राम व चुन्नीलाल गजबे हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. या सर्व सदस्यांनी आपल्या निवडीचे श्रेय धनंजय रिनाईत, पुरनलाल शहारे, धनलाल रिनायत, ध्रुवराज ठाकरे या भाजपा कार्यकत्र्यांना दिले. यावेळी नानेश्वर राऊत, गुलाब गजबे, दिलीप डोंगरे, मिताराम कटरे, दवनलाल बिसेन, सदाशिव बघेले, हिरालाल गजबे, माणिक मेश्राम, डॉ. रिनायत, दिनकर रोकडे, श्यामराव फुलसुंगे प्रामुख्याने उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्यांचे भाजपा पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी अभिनंदन केले.