गराडा टोला येथे तान्हा पोळा उत्साहात

0
10

लाखनी दि.१४-स्थानिक गराडा टोला येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये गावातील सर्व बालगोपालांनी आपापले नंदिबैल अतिशय उत्तम सजवून आणले होते. याच निमित्ताने रांगोळी, फुगड़ी, हंडिफोड इ. स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांसाठी हळदी कुंकु कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती लाखनीच्या नवनियुक्त सभापती रजनीताई आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा सुलोचनाताई बोदेले, वासुदेवजी वाघाये, माजी सरपंच सुरेशजी वाघाये, रामचंद्रजी दिघोरे, ग्रा.प. सदस्य ताराचंदजी वाघाये, रघुनाथजी देशमुख, सुनीलजी देशमुख व समस्त ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुंण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत वाघाये यांनी तर प्रास्ताविक सुरेश वाघाये यांनी केले आणि आभार प्रदर्शन निखिल देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद वाघाये, उदाराम कांबळे, हरीश वाघाये, अश्विन शेळके, आकाश सेलोटे, यांनी विशेष परिश्रम घेतले.