शहरातील खड्डयांची दुरुस्ती करा-मनसे

0
15

गोंदिया, दि.१५:-गोंदिया शहरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन घालण्याकरिता खोदण्यात आलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांची दुरुस्ती गणेशोत्वापुर्वी करण्यात यावी.तसेच खड्डे तयार होण्यासाठी कारणीभूत असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी गोंदिया शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी केली आहे.जीवनप्राधिकरण विभागातंर्गत पाइपलाइन घालण्याकरिता खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे अनेक ठिकाणी गढ्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.तसेच अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे गणेशोत्वादरम्यान भाविकांनी आपल्या घरी शाडूच्या गणपतीची मूर्तीची स्थापना करून पर्यावरणाच्या बचावासाठी सहकार्य करावे असे मनसे जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांनी म्हटले आहे.पीओपीची मूर्ती दिसायला सुंदर दिसत असली तरी पर्यावरणासाठी घातक आहे.तसेच फुल,निर्माल्य हे नदीत न घालता आपल्याच घरी एका खड्यातच पुरावे असेही आवाहन चौरागडे यांनी केले आहे.