सालेकसा दि.१५: कावराबांध येथील झुलनबाई कपूरचंद लिल्हारे (५0)या महिलेची प्रकृती अचानक गंभीर होऊन दुसर्या दिवशी तिचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देताना तेथील डॉक्टरांनी डेंग्युमुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. त्यामुळे आरोग्य विभागसुध्दा खडबडून जागा झाले आहे.
दि.१२ला झुलनबाईची प्रकृती बिघडली. तिला गोंदिया येथील बजाज हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. तिथे एक दिवस औषधोपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उलट प्रकृती आणखी खालावली. तेव्हा तिला नागपूरला रेफर करण्यात आले.
१३तारखेला सायंकाळी उशिरापर्यंत नागपूर येथील शासकीय मेडिकलमध्ये भर्ती करण्यात आले. तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले, मात्ररात्री १२ वाजता झुलनबाईने मृत्यूशी झुंज देत प्राण सोडला.
डॉक्टरांनी मृत घोषित करून डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे नमूद करून मृतदेह कुटुंबाला सुपूर्द केला.झुलनबाईच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली असून डेंग्यूची भीती व्यक्त केली जात आहे.