गोंदिया,दि.१५ -जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या पदांमुळे सेवेवर परिणाम होऊ नये व मनुष्यबळ अभावी कोणत्याही प्रकारे शिक्षण व आरोग्य सेवा कोलमडू नये याकरिता दोन्ही विभागांतर्गत रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी त्वरित कारवाई करण्यासंबधीचे निर्देश जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रीडा व आरोग्य समितीचे सभापती पी.जी. कटरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाèयांना दिले. यावेळी सभेला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ राजकुमार पुराम, शिक्षणाधिकारी घनश्याम पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथम दोन्ही विभागाद्वारे गुणवत्तापूर्ण सेवा जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात यावी या दिशेने पी.जी. कटरे यांनी प्रथम पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने कटरे यांनी दोन्ही विभागाचे विभाग प्रमुख व सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त सभा घेऊन दोन्ही विभागातील रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेतला. त्यानंतर ज्या रिक्त जागा त्वरित भरण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण नाही अशा सर्व जागा भरण्याकरिता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी. तसेच ज्या जागा न्यायालयीन प्रक्रिया qकवा शासन स्तरावर विचाराधीन अथवा प्रलंबित असल्यास त्याचा सतत पाठपुरावा करण्यात यावा व तसा अहवाल वेळोवेळी जिल्हा परिषदेचे मुकाअ व मला सादर करावा. असे निर्देश ही यावेळी दिले. शिक्षण व आरोग्य हे दोन्ही विभाग जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेशी प्रत्यक्ष जुळलेले असल्याने मनुष्यबळाअभावी सेवेवर बिपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता सभापती कटरे यांचे हे सकारात्मक पाऊस असल्याची प्रक्रिया सर्व सामान्य जनता व रिक्त पदांमुळे ज्यांच्यावर अधिकच्या कामाचा भार पडलेला आहे त्यांच्या मनाला दिलासा देणारा ठरला आहे.