रस्ता, नाला बांधकामाच्या चौकशीची मागणी

0
9

भंडारा दि.१८: नगर परिषद भंडारा अंतर्गत प्रभाग क्र. ६ मध्ये त्रिमूर्ती चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक, पोस्ट ऑफीस चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक, बजाज कॉम्प्लेक्स ते शिवाजी स्टेडीयम पर्यंत सांडपाणी जाण्यासाठी मोठय़ा नाल्याचे पुलासह रस्ता, मजबुतीकरण हॉटमिक्स पद्धतीद्वारे करण्याचे काम, वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत आहे.जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळेस पालिकेतील गट नेता सूर्यकांत इलमे, आशा उके, न.प. सदस्य विकास मदनकर, संजय मते, मनोज बोरकर, नरेंद्र श्रीवास्तव, रवी डारे, शुभम पाल, अरविंद पडोळे, निघत महजबीन खान, इरशाद खान, जावेद शेख, आशिष मोहबे, अजय ब्राम्हणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बांधकाम मंजूर अंदाजपत्रकानुसार न होता बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे. रस्ता बनताच उखडण्याचे काम सुरु झाले. नगरपालिका ही भ्रष्टाचाराची मोठी दलदल असल्यामुळे प्रभाग क्र. ६ च्या प्रबुद्ध नागरिकांनी नगरसेविका शेख शमीमा अख्तरी यांचे नेतृत्वात लेखी तक्रार दिली आहे.
सदर बांधकाम योग्यरित्या व्हावे यासाठी कोणत्याच प्रकारचे पाऊल उचलण्यात आलेले नाही.यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण होत असल्यामुळे जनतेचे म्हणणे आहे की, जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होवू देणार नाही. सदर बांधकाम मंजूर अंदाजपत्रकानुसार व्हावे व बांधकामाच्या दर्जाकडे शासनाने लक्ष घालून चांगले काम करून घ्यावे व भ्रष्टाचार होता कामा नये. शासनाने जनतेच्या भावनेचा आदर करावा अन्यथा जनआंदोलनाचा मार्ग घेऊन समोर जावे लागेल.