श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी

0
21

गोरेगाव दि.१९: तालुक्यातील ग्राम सोनी येथील मनिभाई पटेल हायस्कूलमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. माजी आमदार हरिहरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाचे उद््घाटन मंहत प्रशांत मुनी लखापती यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अँड.के.आर. शेंडे, विशाल शेंडे, हनुमती शेंडे, विजय बहेकार, आर.एन. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिपप्रज्वलीत करुन करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वंदना प्रस्तुत केली व चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर माहिती कथन केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही.टी. पटले यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतून एस.एस.सी व एचएचसी मार्च २0१५ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.