जिल्हा रुग्णालयात नर्सने लावला चुकीचा रक्त,प्रकृती चिंताजनक

0
21

गोंदिया,दि.18- येथील जिल्हा सामन्य रुग्णालयात एका आरोग्य सेविकेने आपल्या कामात हलगर्जीपणा करीत उपचारासाठी दाखल असलेल्या दोन रुग्नांना चुकीचा रक्त गट लावल्याने त्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.सयद अक्रम या रुग्णाला A पाॅझीटीव ( A + ) रक्त गट लावयचे असताना मात्र नर्सने चुकीने B पाॅझीटीव ( B + ) रक्त गट लावला. तर ईश्वरदास उके या रुग्णाला B पोजेटीव ( B + ) रक्त लावयचा असताना मात्र चुकीने A पाॅझीटीव ( A + ) रक्त लावले.दरम्यान दोघांच्या शरीरावर खाज सुटताच नर्सला आपण चुकीचा रक्तगट लावल्याचे लक्षात आले.आणि लगेच रक्त पुरवठा बंद करून दोन्ही रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.दरम्यान रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ झा यांना विचारणा केली असता रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स ची संख्या कमी असल्याने ओवर टाइम काम करत असल्याने हि चूक घडल्याचे सागितले.मात्र संतापलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी दोषी नर्स ला निलंबन करण्याची मागणी केली.