गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेत साजरे करावे-कदम

0
14

काचेवानी : संपूर्णराज्यात येत्या १७ तारखेपासून गणेश उत्सवाला सुरूवात होत आहे. हा उत्सव शहर ते खेडेगावापर्यंत उत्साहाने साजरा केला जातो.पोलिसांनीसुध्दा शांतता आणि सुव्यवस्था असावी याकरिता ठाण्यात सभा घेवून गावातील प्रमुखांना तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांना लेखी सूचना दिल्या आहेत.
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत लहान-मोठे एकूण ३९ गावे येतात.यावर्षी ४0 गणेशमूर्ती स्थापित होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गणेश उत्सवाच्या परवानगीबाबत आलेल्या अर्जांवर योग्य त्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. सध्या परवानगी संबंधात येणार्‍या अर्जावर विचार करण्यात येईल, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.
शांतता व सुव्यवस्था असावी याकरिता गंगाझरीचे ठाणेदार सुरेश कदम यांनी गावकर्‍यांच्या उपस्थितीत सभा घेतली.गावात शांतता व सुव्यवस्था कशी ठेवावयाची आहे, याची माहिती दिली. गावात सार्वजनिक स्थळी एका गावात एकच गणपती असावा, उत्सव स्थळी आवाजाबाबत न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यात यावे, गावातील व बाहेरील दर्शकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, उत्सव साजरे करताना पैशाची नासाडी करण्याचे टाळावे, असे ठाणेदारांनी सांगितले.
ये-जा करणार्‍यांना त्रास होणार नाही, गावात दारूबंदी असावी, उत्सव स्थळी हुक टाकून वीज कनेक्शन घेवू नये, वीज पोलवर तसेच शासकीय इमारतीवर पोस्टर-बॅनर लावण्याचे टाळावे, उत्सवस्थळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वयंसेवक कार्यकर्ते नियमित ठेवावे, लाऊडस्पीकरच्या आवाजाने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, असे आवाजत ठेवण्याचे कदम यांनी सांगितले.
गणेश उत्सवादरम्यान कायद्याचे पालन करण्यात आले नाही तर उत्सव समितीस आणि गावच्या प्रमुख व्यक्तीला जबाबदार धरून योग्य ती कारवाई करण्यात येईल. यात कसल्याही प्रकारची सुनावनी ऐकली जाणार नाही, असेही ठाणेदार कदम यांनी बोलून दाखविले.