दतोरा सरपंचपदी पाथोडे

0
14

गोंदिया : जवळील ग्राम दतोरा येथील सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे रोशन मोतीराम पाथोडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.येथील माजी सरपंच सुरजलाल महारवाडे यांच्यावर मागील दीड वर्षांपूर्वी अविश्‍वास प्रस्ताव पारित करण्यात आला होता. या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती व त्यामुळे सरपंचपद रिक्त होतो. या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिल्याने सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली व त्यात पाथोडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य सुनील धुर्वे, छाया शिवणकर, लक्ष्मी हेमणे, अरूणा डोंगरे, पुष्पा महारवाडे तर शिवसेनेच्या शिला महारवाडे यांनी त्यांना सर्मथन केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री दीपक कदम, मधु हेमणे, मोहन हेमणे, राजेंद्र चुटे, श्याम महारवाडे, मोहन महारवाडे, श्याम आमकर, रामलाल आमकर, बाबूलाल गायधने, योगेश्‍वर हेमणे, सुरेश मेंढे, शिवप्रसाद हेमणे, भाऊराव पाथोडे, प्रकाश दुबे, ताराचंद महारवाडे, गिरधारी हेमणे, हंसराज डोंगरे, दिगंबर चुटे, विजेश महारवाडे, विजय पाथोडे उपस्थित होते.