झाडीबोली साहित्य विषयावर कार्यशाळा

0
18

चंद्रपूर दि.2:: ग्ाोंडवन शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित मातोश्री बालवाडी, प्राथमिक उच्च प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त प्राचार्य सूर्यकांत खनके यांच्या मार्गदर्शनाखाली झाडीबोली साहित्य विषयावर कार्यशाळा मंगळवारी पार पडली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष अँड. रविंद्र खनके होते. उद्घाटक म्हणून मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, प्रमुख वक्त्या म्हणून अंजनाबाई खुणे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अँड. ए. ना. जांभुळे, श्रीराम खुणे, शेखर वाढई, बंडोपंत बोढेकर, यशवंत हजारे, स्मिता पाचपोर, नारायण धर्मपुरीवार, नेहा खनके, वेनुश्री खनके, सागर बदाने, सुष्मा खनके, सूर्यकांत खनके, मुख्याध्यापक वाढई, पर्यवेक्षक बीजवने उपस्थित होते. संचालन मनोहर कायडींगे तर आभार पवन पिजदूरकर यांनी मानले.