शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर

0
23

भंडारा, दि. 11 :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी दिले. अल्पसंख्याक समाजाकडून प्राप्त झालेल्या तक्रारी बाबत चर्चा, निराकरण व उपाययोजना या बाबतच्या विश्रामगृह, भंडारा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. तिवारी, मुख्याधिकारी विनोद जाधव यांची उपस्थिती होती.या बैठकीमध्ये शिक्षण विभाग, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, महिला बालकल्याण विभागाचा त्यांनी आढावा घेतला.