पदाधिकाNयांचा हक्कभंग तर अधिकाNयांचा माफीनामा

0
6

आमगाव दि.७: पंचायत समिती आमगाव येथील सभापतींच्या अधिकार कक्षावरून उठलेले वादळ पंचायत समितीच्या अधिकाNयांच्या अंगलट आले. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले तर अधिकाNयांना स्वत:च्या माफीनंतर मागचे पाऊल घेण्यास बाध्य व्हावे लागले.
आमगाव पंचायत समिती येथील अधिकारी कर्मचाNयांची पदाधिकारी, सदस्य व नागरीकांशी उर्मटपणे वागण्याची शैली पंचायत समिती परिसरात नवीन नाही. ५ ऑक्टोंबरला सभापती दालनात शेतकरी, सामान्य नागरीक आपल्या प्रश्नांना घेऊन सभापती यांच्याशी संवाद साधत होते. यासंदर्भात सभापती यांनी सहायक गटविकास अधिकाNयास विचारणा केली. दरम्यान शेतकरी व इतरही नागरीक प्रश्न करू लागले असता नागरीकांसह सभापतींशीही उर्मटपणे वागले. सभापतींचे हक्कभंग झाल्यामुळे जनप्रतिनिधींमध्येही अधिकाNयांच्या विरोधात रोष प्रकट होऊ लागले. सदर प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई मेंढे यांनी पंचायत समिती सभागृहात पदाधिकारी व अधिकारी यांची समन्वय सभा ६ ऑक्टोंबरला आयोजित करण्यात आली. सदर सभेत सहायक गटविकास अधिकारी यांच्या वर्तवणुकीवर पदाधिकारी व सदस्यांनी हक्कभंग आणले. प्रकरण तापत असल्याचे भान होताच गटविकास अधिकारी यांनी झालेले प्रकार चुकीने झाले असल्याचे मत व्यक्त करीत दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे प्रकरणाला अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी निवळते घेतले. तर सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना समोर होण्यासाठी अधिकारी व कर्मचाNयांनी समोर व्हावे. नागरीकांना कोणतीच असुविधा पंचायत समिती कारभारातून पुढे येऊ नये अशी ताकीदही दिली.