सी. जे. पटेल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
13

तिरोडा,दि.७- येथील सी. जे. पटेल महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागातर्फे बी. एस.सी.च्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला.सी. जे. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय सिंह यांच्या मार्गदर्शनात व प्राध्यापक आर. ए. मस्के यांच्या अध्यक्षतेत नुकतेच वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. बी. एस.सी. प्रथम आणि सेमेस्टर द्वितीय मधून प्रथम आलेली शिखा राउत तसेच सेमेस्टर तृतीय मधून प्रथम आलेली शोभा बघेले व सेमेस्टर चतुर्थ मध्ये प्रथम आलेली गुणवंता पटले यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. महेश व्ही. कावळे यांनी वनस्पती शास्त्राचे जागतिक महत्व व वनस्पतीचे संगोपनाची काळजी या विषयी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ. वलय तागडे यांनी केले. संचालन प्रा. रविंद्र झोडे यांनी केले तर आभार प्रा. आय. जे. पांडे यांनी आभार मानले.