पालकमंत्री घेणार आदर्श ग्राम कनेरी(राम)येथे आढावा बैठक

0
8

गोंदिया,दि.७-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे उद्या जिल्ह्याच्या दौèयावर येत आहेत.याभेटीमध्ये विशेष करुन ते आदर्श आमदार ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी (राम)या गावात आढावा बैठक घेणार आहेत.आदर्श ग्राम घेण्यात पालकमंत्री अनुस्तुक या मथळ्याखाली साप्ताहिक बेरार टाईम्सने सर्वांत आधी वृत्त प्रकाशित केले होते.त्या प्रकाशित वृत्ताची अखेर पालकमंत्री ब‹डोले यांनी दखल घेत कनेरी(राम) गावाला आदर्श आमदार ग्रामकरीता निवडले आहे.