२२ कोटीचा तांदूळ पाचवर्ष लोटले तरीही गोदामात पोचलाच नाही

0
13

पाच वर्षानंतरही राईसमिलर्सवर कारवाईस शासनाची टाळाटाळ

गोंदिया- येथील ३० राईस मिल मालकांनी मागील ४ वर्षा पूर्वी राज्य शासनाला देय्य असलेला २२ कोटी रुपयांचा १ लक्ष क्विंटल तांदूळ शासनाला अजून सुद्धा परत केलेला नाही किंवा तेवढी रक्कम सुद्धा शासनाच्या तिजोरीत जमा केलेली नाही . विशेष म्हणजे या राईस मिल मालकावर कोणतीही दंडात्मक व फौजदारी कारवाई राज्य शासनाने केलेली नाही,हे राईस मिल मालक गोंदिया राईस मिल मालक संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. आणि याच राईस मिल मालक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य कार्यक्रम गोंदिया येथे शनिवार १७ ओक्टोंबर ला आयोजित केला आहे .
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने २०१०-११,२०११-१२,२०१२-२०१३ या तीन वर्षात गोंदिया येथील ३० राईस मिल मालकांना आदिवासी विभागातून खरेदी केलेला धान भरडाइ करून त्याचा तांदूळ राज्य शासना कडे जमा करण्यासाठी दिला होता,आदिवासी विकास महामंडळ व राईस मिल मालक यांच्यात झालेल्या करार प्रमाणे धानाची उचल केल्या नंतर १५ दिवसाचे प्रती क्विंटल हे ६७ किलोग्राम तांदूळ याप्रमाणे ९० हजार क्विंटल तांदूळ जमा करणे आवश्यक होते.प्रती क्विंटल रु२२०० प्रमाणे याची किंमत रु २२ कोटी होते,२०१० ते २०१५ पर्यंत यापैकी एक क्विंटल सुद्धा तांदूळ राज्य शासनानी निर्देशित केलेल्या अन्न महामंडळाच्या गोदामा मध्ये जमा करण्यात आलेले नाही.करारनाम्या प्रमाणे १५ दिवसाचे आत तांदूळ शासकीय गोदामात जमा न केल्यासदर महा दर शेकडा १५%दराने व्याजाची एक रकमी रक्कम वसुली करण्याची तरतूद आहे,परंतु राईस मिल मालकांनी तांदूळ परत केला नाही ,त्याची किमत शासन तिजोरीत भरणा केली नाही दंडात्मक असलेली दरसाल दर शेकडाप्रमाणे १५%व्याज रक्कम सुद्धा जमा केले नाही. तरी सुद्धा त्यांच्या वर कारवाई झालेली नाही .फौजदारी कारवाई असे आदेश देण्यात आले होते संबंधित जिल्हाधिकारी याना फौजदारी कारवाई केल्याचा अहवाल सदर करण्या विषयी लेखी कळविले होते, तरी सुद्धा कारवाई झाली नाही. उलट फौजदारी कारवाईचा आदेशच बदलण्यात आला आणि शासनाचे आर्थिक नुकसान करणाèया राईस मिल मालकांना संरक्षण देण्यात आले .
आदिवासी विकास महामंडळाच्या धानाची उचल करण्यापूर्वी तितक्या रकमेची बँक हमी द्यावी लागते ती न देताच धानाची उचल केली ,यापैकी ६ राईस मिल मालकांचे ५ लक्ष रुपये प्रती याप्रमाणे मुदती ठेवी जमा करण्यात आल्या आहेत .आदिवासी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार संताराम राइस एमआयडीसी गोंदिया ९ हजार ९१६.०५ qक्वटल,पंकज मोदी अँड कंपनी गोंदिया ६ हजार ९४९.२६ क्वि. रामदेव राइस मिल, बरडटोली २ हजार ४४५.९७ क्वि. जय जलाराम पराबायqलग तुमखेडा ५ हजार २०७.६२ qक्व. हरिओम टड्ढेडर्स गोंदिया १८ हजार ४६२.५७ क्वि. राजकमल राइस मिल कारंजा १ हजार ९९४.०९ qक्व. दादीजी इंडस्टड्ढीज सावरी ८९१.७१ क्वि. शांती राइस मिल गोंदिया १ हजार ६०.४७ क्वि. शिवकृपा स्टीम डव्वा २ हजार ९४७.३४ क्वि. अग्रवाल राइसमील भागी देवरी २ हजार ३१९.१३ क्वि. जमना पराबायqलग कारंजा गोंदिया ३ हजार ६२८.५४क्वि. श्रीकृष्ण राईसमील अर्जुनी मोर २ हजार९८०.६३ क्वि. श्रीकृष्ण इंडस्टड्ढीज देवरी ५ हजार३३५.१८qक्व. स्वेता राइसमील खमारी ५ हजार २६५.६७ क्वि. माहेश्वरी इंडस्टड्ढीज आमगाव ४ हजार ९२२.१८ qक्व. गणेश राइस मिल आमगाव १ हजार ५११.९९ क्वि. श्रीधर राइस कार्पोरेशन तुमखेडा १ हजार ८७२.४८ क्वि. अंबालिके राइस इंडस्टड्ढीज धामनगाव १ हजार ६११.७४ क्वि. राधे टड्ढेqडग कंपनी गोंदिया १ हजार ६८५.८८ क्वि. जयअंबे राइस इंडस्टड्ढीज नवेगावबांध २ हजार ६२०.४४ क्वि. विशाल राइस मिल कुरुड ५३१.४६ क्वि. नारायणलाल मन्नालाल बोपाबोडी २५६.५८ क्वि. खंडेलवाल पराबायqलग अदासी गोंदिया ३३१.२७ क्वि. डाबडाजी टड्ढेडर्स गोंदिया ५२९.२०क्वि. ज्योती अ‍ॅग्रो इंड. तुमखेडा १ हजार ८२१.९ क्वि. धान आदी राईस मिलर्संना देण्यात आले होते.
याबाबत गोंदिया जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांना विचारणा केली असता राईस मिलर्संनी तांदूळ qकवा त्या तांदळेच्या किमंतीची कुठलीही रक्कम अद्याप शासनाकडे जमा केलेली नाही.तसेच गुण नियंत्रणाची चमू आल्या नंतर त्यांनी तांदूळ तपासून अहवाल दिल्या नंतर तांदूळ जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल