बजरंगदलाने दाखविले मुख्यमंत्र्याना फलक

0
11

राज्यात सध्या नवरात्रोत्सव सुरु असून या उत्सव काळात रात्री १० वाजेपर्यंत फक्त रासगरबा खेळण्याची परवानगी दिली आहे.तर दुसरीकडे रात्री १२ वाजेपर्यंत डांसबारला परवानगी दिली आहे.यावर गोंदिया बजरंग दलाच्यावतीने येथील नेहरु चौक व आंबेडकर चौकात विदर्भ प्रमुख देवेश मिश्रा,मनोज मेंढे,सुधीर ब्राम्हणकर यांच्या नेतृत्वात वारे सीएम तेरा खेल निराला डासंबार रात १२ तक ़खुला और रासगरबा को १० बजे बंद करवा डाला या आशयाचे फलक शनिवारी दाखवून निषेध नोंदविण्यात आला. तर एनएसयुआयच्या कार्यकत्र्यांना मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याअगोदरच शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.