29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम 1 जुलैपासून सुरु

क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम 1 जुलैपासून सुरु

0
22

blank

क्षयरुग्ण शोध सनियंत्रण समितीची सभा

गोंदिया दि.1 : जिल्हास्तरीय टीबी फोरम समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) तथा
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.आर.जे.पराडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी श्री देशपांडे म्हणाले, शासकीय वैद्यकीय अधिकारी, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व तालुका आरोग्य
अधिकाऱ्यांनी टीबी नोटिफिकेशन व इतर सर्व निर्देशांकात वाढ करण्यात यावी. उपचार घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना
निक्षय पोषण योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद निक्षय प्रणालीमध्ये करणे अनिवार्य आहे. त्याकरीता
क्षयरुग्णाची नोंद करण्यासाठी 500 रुपये अनुदान देय आहे. क्षयरुग्णांच्या उपचाराअंती आऊटकमची नोंद केल्यानंतर
500 रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी वेळेवर क्षयरुग्णांची नोंद निक्षय पोर्टलवर करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
डॉ.पराडकर यांनी टीबी फोरमचे महत्व व कार्य, कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमीत सनियंत्रण अभियान 1
जुलै ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे असे सांगून ते पुढे म्हणाले,
जिल्ह्यातील 956 गावांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन नविन क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधून उपचार केले
जाणार आहे. क्षयरोग संबंधीच्या प्रयोगशाळा तपासण्या, एक्स-रे, संपूर्ण कालावधीचा उपचार शासकीय आरोग्य
संस्था तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये नि:शुल्क केला जातो असे त्यांनी सांगितले.

blank