विनानिविदा केले ६ बंधार्‍यांचे काम वाटप

0
15

2 नोव्हेंबरपासून जि.प.स्थायी व सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश बंदी

गोंदिया दि..३१: घोटाळ्यांसाठी कुप्रसिद्ध झालेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत बंधार्‍यांचे कामवाटप मनमर्जीने केल्याचा प्रकार घडला आहे. ९६ बंधार्‍यांपैकी ६ कामे विनानिविदेने वाटण्यात आली. याशिवाय बांधकाम विभागाची काही कामेही अशाच पद्धतीने वाटण्यात आली असून काँग्रेसचे पदाधिकारी हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी आत्ता स्थायी आणि सर्वसाधारण सभेत जी पत्रकारांना बसण्याची परवानगी होती त्यास आडकाठी आणून पत्रकारांना सभागृहात प्रवेश देण्यास खुला विरोध करीत असल्याने सभागृहातील वास्तव्य जनतेसमोर येण्यापासून थांबविण्याचा प्रकरा करु लागली आहे.येत्या 2 तारखेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना स्पष्टपणे जि.प.अध्यक्षांनी प्रवेश नाकारला आहे.त्यांनी पत्रकारामुळे सदस्य बोलण्यास घाबरतात हे कारण पुढे केले असले तरी पत्रकारांना बैठकीपासून रोखण्याचे खर कारण वेगळेच असू शकते.पत्रकार सभागृहात राहीले तर भ्रष्टाचारावरील वृत्त आणि गोंधळ जनतेपर्यंत पोचेल ते पोचू नये यासाठीच पत्रकारांनाही आत्ता प्रवेश पारदर्शक आयएसओ जिल्हा परिषदेने सभागृहातील सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेत प्रवेश नाकारला आहे.
जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून बंधार्‍यांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. यातील ९६ बंधार्‍यांच्या कामांपैकी ६ कामे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी निविदा न काढताच ग्रामपंचायतींना वाटप केले. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतींशी आर्थिक व्यवहार झाले त्यांनाच ही कामे मिळाली, बाकी ग्रामपंचायतींनी मात्र असा व्यवहार केला नसल्यामुळेच त्यांना या कामांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप जि.प.स्थायी समितीचे सदस्य सुरेश हर्षे तथा जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही हा मुद्दा हर्षे यांनी उपस्थित केला. बंधार्‍यांच्या आणि इतर बांधकामाच्या मिळून १७ कामांचे वाटप परस्पर ेकेल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. ही नुकसानीची रक्कम अतिरिक्त मु.का.अधिकार्‍यांकडून वसूल करावी अशी मागणी केली. जि.प.अध्यक्षांनी शासन निर्णयाची पडताळणी करून कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.