मशरूम शेती उत्पादनावर मार्गदर्शन

0
30

देवरी,दि.25- सडक अर्जूनी तालुक्यातील राजर्षी शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच मशरूम शेती उत्पादन या विषयावर एका मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरात उपस्थित शेतकऱ्यांना मशरूमची लागवड आणि विक्री व्यवस्थापन प्रभावीपणे कसे करता येईल, या विषयी महाविद्यालयाचा विद्यार्थी ललित चौधरी याने उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य व्ही डी आराम, प्रा. बी पी मेश्राम आणि प्रा. वी डी पटले यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत कमी खर्चात  जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले