कवियत्री सोनाली सहारे-रायपूरेंच्या “काव्यसृष्टी”या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

0
25

ब्रम्हपूरी,दि.02ः- येथील कवियत्री सोनाली सहारे- रायपुरेच्या “काव्यसृष्टी”या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेचं नागपूरच्या मराठी शिलेदार समूहातर्फे करण्यात आले.प्रसिद्ध साहित्यिक लेखक लखनसिंह कटरे यांची या काव्यसंग्रहाला प्रस्तावना आहे. तसेच प्रा.डॉ.विद्याधर बनसोड चंद्रपूर यांनी अभिप्राय व सदिच्छा दिल्या.सोनालीचे बाबा डॉ.एम् ए.रायपुरे व आई अर्चना रायपुरे यांनी या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. मराठी शिलेदार समूहातर्फे साहित्यसेवा सन्मान 2021 हा पुरस्कार सोनाली सहारे यांना देण्यात आला. या कवितासंग्रह प्रकाशनप्रसंगी डॉ.एम.ए. रायपुरे व अर्चना रायपुरे गडचिरोली यांनाही मराठी शिलेदार समूहातर्फे शाल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडला.संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील,मराठी शिलेदार समूहातील सदस्य व महाराष्ट्रातून आलेले कवी कवियत्री उपस्थित होते. या कविता संग्रहाला डॉ.खानोरकर, साखरकर मॅडम,श्री.राऊत व ब्रह्मपुरी येथील कवी कवयित्रीने शुभेच्छा दिल्या.तसेचं सिध्दार्थ सहारे,साची,सम्राट, लिना,शर्लीन , राहुल रायपुरे , मोनाली,जीया,अभिधम्म, परमेश्वर दुर्गे, गेडाम आजोबा ,तरुना रामटेके,शिलाबाई सहारे , तसेच मित्र-मैत्रिणी यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.