ग्रामसेवक संघटनेने केला नवनियुक्त सीईओ पाटील यांचा सत्कार

0
137

गोंदिया,दि.03ः- गोंदिया जिल्हा ग्रामसेवक युनियनच्यावतीने गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी प्रदीर्घ काळापासून विविध नाय मागण्या संदर्भाने सुरू असलेले आंदोलन नव्याने सीईओ रुजू झाल्यामुळे प्रशासकीय बाब लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार स्थगित करण्यात येत असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांना यावेळी देण्यात आले.तसेच यूनियन मागण्या संदर्भाने वेळ देऊन सविस्तर चर्चेअंती न्याय मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी दिली.यावेळी कार्तिक चव्हाण मानद अध्यक्ष, कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष /विभागीय सचिव, दयानंद फटिंग सरचिटणीस, लक्ष्मण ठाकरे कोषाध्यक्ष, रामा जमाईवार संघटक उपस्थित होते..