प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन १३ सप्टेंबरला

0
119

गोंदिया,दि.03ः-जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकालात निघाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने १३ सप्टेंबरला जिल्हा परिषद गोंदिया समोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.मागिल दीड दोन वर्षांत संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आहे. आश्वासित करण्यात आले परंतू प्रत्यक्षात मागण्या सोडविण्यात आल्या नाहीत.कोरोना कालावधीत संघटनेने सावध भूमिका घेऊन कोविड 19 च्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे केलीत.या कालावधीत कर्तव्यावर असतांना २०-२५ शिक्षकांचा मृत्यू झाला असून कोविड १९ च्या आजारानेही काही शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे.प्रत्येक महिन्यात वेतन २०-२५ दिवस उशिराने होत असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून विविध बॅंकाकडून घेतलेल्या कर्जावर व्याजाचा भुर्दड भरावा लागत आहे.यामूळे शिक्षकांत नाराजीचा सूर असल्याने संघटनेने प्रलंबित मागण्या ५ सप्टेंबर २०२१ शिक्षक दिवस पर्यंत निकालात काढण्यात यावे अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा ईशारा ५ ऑगस्ट २०२१ ला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते.परंतु त्यानुसार दखल घेण्यात आली नाही.आणि म्हणून शिक्षकांच्या न्याययोग्य मागण्या निकालात निघाव्यात यासाठी १३ सप्टेंबर २०२१ वार सोमवारला एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यातून मागण्या निकालात निघाल्या नाही तर बेमूदत उपोषण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणीने घेतल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष डी.टी.कावळे यांनी प्रसिद्धी माध्यमातून दिली.प्रलंबित मागण्यामध्ये कोविड19 अंतर्गत कामावर असताना मृत्यू पावलेल्या सर्व शिक्षकांचे विमा सुरक्षा कवच प्रस्ताव शासन स्तरावर मंजूरी साठी पाठविण्यात यावे,वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात यावे,विज्ञान विषय शिक्षक उच्चश्रेणी मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमूख यांची रिक्त पदे अविलंब भरण्यात यावे,वेतन ५ तारखेच्या आत मिळण्याची कायम स्वरूपात व्यवस्था करण्यात यावी यांत कधी शाईची प्रत तर कधी बजेटमुळे वेतन लांबतो व त्यामुळे बॅंकाकडील असलेल्या कर्जावर व्याजाचा भुर्दड ४ हजार शिक्षकांवर बसतो म्हणून cmp प्रणाली लागू करण्यात यावी,जी.पी.एफ.पावत्या ६ व्या वेतन आयोगाच्या ५ हप्त्यांच्या नोंदीसह देण्यात याव्या,डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांच्या कपात केलेल्या सी.पी.एफ.राशीची हिशोब पावती देण्यात यावी,सडक अर्जुनी तालुक्यातील ६ व्या वेतन आयोगाच्या ४ व ५ हप्त्याची गहाळ झालेली राशी शिक्षकांना मिळवून देण्यात यावी,विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी,२००९ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना कायम आदेश देण्यात यावे,एकस्तर वसूली व मूळ वेतनावर वेतननिश्चिती पत्र रद्द करून वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होईपर्यंत एकस्तर वेतन सुरू ठेवण्यात यावे,सातव्या वेतन आयोगाच्या दुसरे हप्त्याची राशी देण्यात यावी,सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुखाचे प्रभार केंद्रातील सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांना देण्यात यावे,परिक्षा पूर्व परवानगी व कार्योत्तर परवानगी आदेश देण्यात यावे,सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चिती प्रस्ताव पं.स.स्तरावरुन मागवून वित्त विभागाची मंजूरी प्रदान करण्यात यावी,सेवानिवृत्ती प्रस्ताव सेवानिवृत्तीचे ६ महिण्याआधी मंजूरी साठी पाठविण्यात यावे,वैद्दकिय परिपूर्ती बिल,रजा प्रकरणे,प्रसूती रजा प्रकरणे नियमित निकालात काढण्यात यावे,सेवानिवृत्त होणारे शिक्षकांकडून संगणक व उपदानाची राशी वसूल करणे बंद करण्यात यावे व ज्या शिक्षकांकडून राशी वसूल करण्यात आली ती परत करण्यात यावी या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.तरी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी धरणे आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन आनंद पुंजे,टी.के.नंदेश्वर, जितेंद्र डहाटे,नाननबाई बिसेन, रेणूका जोशी,डी.टी.कावळे,एस.यू.वंजारी,के.एस.रहांगडाले,ए.डी.धारगांवे,अरूण शिवणकर,एम.बी.रतनपूरे,अजय चौरे,कृष्णा कापसे,किशोर पटले,अनिल वट्टी,प्रकाश कुंभारे, एच.एम.रहांगडाले,विरेंद्र भिवगडे,किशोर शहारे,जे.डी.मेश्राम,डी.एम.दखणे,राजू रहांगडाले, डी.पी.कोसरकर,जिवन आकरे,राजीव भरडे,पांडूरंग कापगते,जितेंद्र गणवीर,अशोक तावाडे,आर.एल.सांगोडे,तुषार ढोमणे,सी.एस.बांगडकर,रोषण टेंभूर्णीकर,घनश्याम भिवगडे,अर्जुन वासनिक,राजेश वट्टी,डी.डी.रिनाईत,जगदीश नाकाडे,देवेंद्र गजभिये, यांनी केले.