35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला घेऊन माजी नगराध्यक्ष बारेवारांचे निवेदन

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला घेऊन माजी नगराध्यक्ष बारेवारांचे निवेदन

0
65

blank

गोरेगाव,दि.03ः-गोंदिया -गोरेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाकरीता कंत्राटदाराने ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.व्यापारीवर्गही यामुळे त्रासले असून शहरातील व्यापारी व जनतेच्या ऑनलाइन मिळालेल्या निवेदनाची दखल घेत माजी नगराध्यक्ष इंजी आशीष बारेवार यांनी आज राष्ट्रीय महामार्ग नागपूर विभागाचे कनिष्ठ अभियंता इंजी. दीपक चव्हाण यांच्यांशी चर्चा करुन शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे अपूर्ण बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली.सोबतच मुख्य चौकातील प्रलबिंत बसस्थानक बांधकामाच्या जागेबाबतही चर्चा करुन समस्यांचे एक निवेदन सादर केले.

blank