गोंदिया 1,भंडारा 0 बाधित रुग्ण

0
45

गोंदिया,दि. 3 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 3 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या 0 आहे.आजपर्यंत 41,205 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,496 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 5 आहे. 4 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

भंडारा,दि.3 :- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन आहे. आज 474 व्यक्तींची चाचणी केली असता 00 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 04 सक्रिय रुग्ण आहेत.आज 02 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58947 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60084 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 50 हजार 842 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60084 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58947 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60084 झाली असून 04 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.