संस्थेच्या प्रगतीत सभासदांचे मोठे योगदान-प्राचार्य अनिल मंत्री

0
22

सुयोग पतसंस्थेच्या वार्षिक आमसभेत सेवा निवृत्त सभासदांचा सत्कार.

अर्जुनी मोरगाव.-सुयोग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची स्थापना १९९७ ला झाली. सभासदांच्या सहकार्याने पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. संस्थेची कार्यप्रणाली बघून संस्थेला सुरूवातीपासूनच अ श्रेणी प्राप्त झाली आहे संस्थेच्या या प्रगतीमध्ये पतसंस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासदांचे फार मोठे योगदान आहे असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले. ते सुयोग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या सन २०२०-२१ वार्षिक आमसभेत अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे प्रभारी सचिव जे.पी .मेश्राम, कोषाध्यक्ष प्रा. यादव बुरडे, सदस्य के .जि. खुणे, सुरेश कुंभारे, एस .एस. खुणे, सी.एम .शेंडे, प्राचार्य विणा नानोटी, छाया घाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेमध्ये सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करणे, मागील वार्षिक सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२०-२१ चे वार्षिक जमाखर्च, नफा तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन करणे, लेखापरीक्षक यांनी दिलेल्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे ऑडिट रिपोर्ट ची नोंद घेऊन दोषांची पूर्तता करणे इत्यादी ठराव वार्षिक सभेत मांडण्यात आले. ठरावावर चर्चा करून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी सभेत सेवानिवृत्त सभासद विणा नानोटी, विश्वनाथ डांगे, जुगलकिशोर राठी, पुष्पा फुंडे, राजेंद्र काकडे यांचा पतसंस्थेतर्फे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक प्रा. यादव बुरडे यांनी केले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन अर्चना गुरनुले यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी बी.एस. गांधी, यादव बु रडे, लोकमित्रा खोब्रागडे, मिलिंद ढोरे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.