चव्हाण मुक्त विद्यापीठाची गोंदिया जिल्हास्तरीय बैठक जगत महाविद्यालयात उत्साहात

0
65

गोरेगाव:- स्थानिक जगत कला आणि इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय कार्यालय नागपूरची गोंदिया जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, संयोजक व सहाय्यक यांची जिल्हास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.वाय.लंजे तर प्रमुख उपस्थितीत विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डाॅ. एन.जी.मेहरे, कक्ष अधिकारी भुपेश गुल्हाने, तांत्रिक सहाय्यक निलेश अगळे, केंद्र संयोजक डाॅ. व्ही. टी.गजभिये विचारमंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला तांत्रिक सहाय्यक निलेश अगळे यांनी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले. कक्ष अधिकारी भुपेश गुल्हाने यांनी आर्थिक व्यवहार पारदर्शक पध्दतीने कशाप्रकारे ठेवता येईल यावर भाष्य केले तर विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डाॅ.एन.जी.मेहरे यांनी सभेला संबोधित करतांना मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य हे तळागाळातील जनतेला शिक्षणाच्या प्रवाहात आणने आहे त्याकरीता अभ्यासकेंद्रामार्फत विविध उपक्रम राबवुन शिक्षणप्रणालीला आनंददायी केले पाहिजे व तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रभावी केले पाहिजे तसेच एक विद्यार्थी-एक झाड हा नवउपक्रम प्रभावीरित्या राबवायला पाहिजे तसेच प्रवेश वाढवावे व अभ्यासकेंद्राच्या सर्व समस्या सोडविल्या जातील अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. सरतेशेवटी सभेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एन.वाय.लंजे यांनी अध्यक्षीय भाषणातून दूरस्थ शिक्षणाला खूप जुनी परंपरा असून दूरस्थ शिक्षण सर्वाना सोयीस्कर असल्यामुळे ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य खरे होतांना दिसत आहे अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. सभेचे संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी केले तर सभेचे प्रास्ताविक व आभार डाॅ. व्ही. टी.गजभिये यांनी केले. या सभेला विविध अभ्यासकेंद्रावरील ३५ केंद्रप्रमुख, संयोजक व सहाय्यक उपस्थित होते. या सभेला यशस्वी करण्याकरिता के.एन.रूकमोडे,ललित बघेले, रमेश डोहळे यांनी अथक परिश्रम घेतले.