राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

0
44

मुंबई,दि.09ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना मोठा दिसाला मिळाला आहे. भुजबळांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळांची निर्देश मुक्तता झाली आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला. या प्रकरणातून छगन भुजबळांचे नाव वगळण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता.

यापूर्वी छगन भुजबळांनी या प्रकरणात आपले नाव गुन्ह्यातून वगळण्यात यावे अशी याचिका सत्र न्यायालयामध्ये दाखल केली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देऊन भुजबळांना मुक्त केले आहे. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावेळी ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

काय आहे हा घोटाळा ?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाला असा आरोप होता. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणामध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयाने देखील भुजबळ यांच्याविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ‘आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ यासाठी तुरुंगामध्ये राहावे लागले. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नसल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितले आणि आज आम्हाला त्या प्रकरणामधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे’ असे भुजबळांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की,’माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. विनाकारण मला तुरुंगात राहावे लाहले. आता गणेशोत्सच्याआधी आमच्यावरील संकट हे दूर झालेले आहे. सत्य परेशान हो सकता हैं… लेकीन पराजित नही…’ असे भुजबळ म्हणाले.

साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए पर…
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए… ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…’ असे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. पुढे ते म्हणाले की, ‘तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. कोणी कितीही कटकारस्थान केले तरी थोटामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावचे विघ्न दूर झालेले आहे. पवारसाहेबांचे, जयंतराव-अजितदादांचे आभार… त्यांनी मला मंत्रिमंडळात घेतले, यासोबतच उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार…’ असे भुजबळ म्हणाले आहेत.