कोरोनामुळे मृत्यू; वारसास दोन लाखाचा लाभ

0
58

तिरोडा : तालुक्यातील खुरशिपार येथील कुमकुम स्वयं सहायता महिला बचत गटाच्या सदस्य सुशीला मोतिराम भंडारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सदर मृतक महिलेच्या वारसास 330 रूपयांच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत दोन लाखाचा लाभ देण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, महिला आर्थिक विकास मंहामंडळ अतंर्गत स्थापित तेजप्रवाह लोकसंचालित साधन केंद्र सुकळी अतंर्गत खुरशिपार येथे कुमकुम बचत गटाच्या महिला काम करतात. या गटातील सुशीला भंडारी या महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यांचा मुलगा वारस असल्याने त्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत तेजप्रवाह लोकसंचालित साधन केंद्र सुकळीच्या माध्यमातून प्रयत्न करून दोन लाख रुपयांचा लाभ देण्यात आला.विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुकळीचे शाखा व्यवस्थापक नलू मेहर यांच्या हस्ते दोन लाख रूपयांचा धनादेश वारस मुलाला देण्यात आला. त्याबद्दल भंडारी कुटुंबाने तेजप्रवाह साधन केंद्राचे आभार मानले.